Common Specialities
{{speciality.keyWord}}
Common Issues
{{issue.keyWord}}
Common Treatments
{{treatment.keyWord}}

Diet In Diabetes!

Dr. Jeevan Sampat Jadhav 87% (80 ratings)
Bachelor of Ayurveda, Medicine & Surgery (BAMS)
Ayurveda, Nashik  •  9 years experience
Diet In Diabetes!

*मधुमेहासाठी चे पथ्य*

*काय खावे*?

१)चहा:- प्रमेही रुग्णाने चहा घेण्याऐवजी आपला"आयुर्वेदिक कषाय" घेतल्यास लाभदायक ठरेल.

२)नाश्ता:- उप्पीट(सांजा), भाजणीचे थालीपीठ,भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, साळीच्या लाह्यांचा चिवडा, शिंगाड्याचे थालीपीठ,इ पदार्थ चालतील.

३)पोळी/चपाती:- गहू, नाचणी,ज्वारी,सातू भाजून त्याची पोळी किंवा भाकरी खाल्ल्यास फलदायी ठरते.

४)फळभाज्या:- कारली,दोडकी, दुधी,भोपळा,पडवळ,शेवगा.

५) पालेभाज्या:- मेथी (सांगितले असल्यास)

६) कडधान्ये:- मूग,कुळीथ,तूर,हरभरे,मटकी,मसूर(सांगितले असल्यास)

७)कंदमुळे:-लसूण,आले,ओली हळद,गाजर,मुळा, कांदा, कमल कंद,नवकोल.

८)पाणी:-उकळून गार केलेले पाणी तहान लागल्यावरच माफक प्रमाणात ग्लास ला ओठ लावून घोट घोट प्यावे.वरून पाणी पिऊ नये.जेवणाच्या सुरुवातीला व नंतर लगेच पाणी पिऊ नये.जेवताना घोट घोट पाणी प्यावे.

९)पेय द्रव्य:- ताजे ताक,ताज्या दह्याचे पाणी घ्यावे.

१०)जेवणाची वेळ:-सकाळी 10-1 च्या दरम्यान व संध्याकाळी 5-7 च्या दरम्यान शक्यतो हलका आहार घ्यावा.

११)फळे:- उंबराची फळे, जांभूळ, कवठ,वेलची केळी.

You found this helpful